Search

जून महिन्याची वीज बिल जास्त आल्याबद्दल अनेक लोकांनी माझ्याकडे अडचणी मांडल्या आहेत. याच संदर्भात.....

जून महिन्याची वीज बिल जास्त आल्याबद्दल अनेक लोकांनी माझ्याकडे अडचणी मांडल्या आहेत. याच संदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता सागर म्हारूळकर, उपकार्यकारी अभियंता मुकुंद आंबी यांच्या सोबत वीजबिल संदर्भात सविस्तर चर्चा केली. कोरोनामुळे नागरिकांना आर्थिक संकटातून जावे लागत आहे, या पार्श्वभूमीवर ज्यादा रकमेच्या बिलामुळे लोक संभ्रमात आहेत, त्यामुळे लोकांच्या शंकांचे निरसन करावे, लोकांना वीज बिलाबद्दल त्रास होऊ नये, बिल भरले नाही म्हणून लगेच कोणाचा वीज पुरवठा खंडित करू नये, अशा सूचना केल्या. अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी याबाबत लोकांचे प्रबोधन करत असून लोकांना कोणताही त्रास होणार नाही, याची महावितरण दक्षता घेईल असे सांगितले.

- आ. ऋतुराज पाटील1 view0 comments