देशभरातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तसेच संकटात व्हाईट आर्मी ही संस्था नेहमीच मदतीसाठी तत्पर असते.पुराच्या काळात व्हाईट आर्मीच्या जवानांनी अनेकांचे प्राण वाचविले.कोरोनाच्या भीषण परिस्थितीत अनेक परप्रांतीय कामगार, ट्रक ड्रायव्हर, तसेच ठिकाणी माळरानावर झोपड्या मारून राहिलेले कामगार आणि हातावर पोट असणारे लोक यांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जाते. गेल्या 19 दिवसात 51 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था या संस्थेने केली आहे.
या कामासाठी या संस्थेचे जवान दिवरात्र कार्यरत आहेत. हे काम करताना त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. या गोष्टी ध्यानात घेऊन मंगळवार पेठेतील एनसीसी भवनच्या पिछाडीस असलेल्या व्हाईट आर्मीच्या कम्युनिटी किचन केंद्राजवळ सॅनिटायझर चेंबर बसवून दिले. जवानांच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी पीपीई किट दिली. तसेच लॉकडाउन वाढल्यानंतरही जोमाने काम करणाऱ्या या संस्थेला 400 किलो तांदूळ दिले. समाजासाठी सतत झटणाऱ्या या संस्थेचे अध्यक्ष अशोकजी रोकडे आणि जवानांच्या कार्याला शुभेच्छा.
- आ. ऋतुराज पाटील
Comments