top of page
Search

गांधीनगर येथील निरंकारी भवन येथे 60 बेडचे कोव्हीड सेंटर उभारणार

आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गांधीनगर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्तीक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये निरंकारी भवन, गांधीनगर येथे कोव्हीड सेंटरची उभारणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या नियोजित कोव्हीड सेंटरच्या ठिकाणी भेट दिली. कोव्हीड सेंटरची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री ना. सतेज पाटील, झोनल इनचार्ज अमरलाल निरंकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 60 बेडचे कोव्हीड सेंटर उभारण्यात येणार आहे.

यामुळे या परिसरातील कोरोना रुग्णांना चांगली सेवा मिळेल असा विश्वास आहे. याठिकाणी योग्य सुविधा देण्यासाठी आम्ही प्राधान्याने प्रयतशील आहोत.

यावेळी, पं.स. सभापती सौ. मिनाक्षी पाटील, गटविकास अधिकारी जयवंत उगले, झोनल इनचार्ज अमरलाल निरंकारी, पं.स. चे माजी सदस्य प्रताप चंदवाणी, वसाहत रुग्णालय आरोग्याधिकारी डॉ. विद्या पॉल, सरपंच रितू लालवाणी, शाम लालवाणी, संतोष सुखवाणी, रामचंद्र निरंकारी, भगवानदास निरंकारी, डॉ. समीर शहा, डॉ. चेतन जुमराणी, डॉ. मनिष पाटील, डॉ. विरेन भोजे, डॉ. बाबासाहेब पाटील, राकेश उर्फ गुड्डू सचदेव, ग्रा.पं. सदस्य सनी चंदवाणी, धिरज टेहल्यानी, मोहिनी साखरे, महेश छाब्रीया, सौ. हेमलता माने, शैलेश शिंदे, रोहन बुचडे यांच्यासह गांधीनगर मधील युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील1 view0 comments
bottom of page