top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

आपल्या कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आज पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्यासोबत काळम्मावाडी जलाशयाजवळ सुरु असलेल्या जॅकवेल आणि इंटेक वेल कामाच्या सद्यस्थितीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

योजनेचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी सध्या सुरू असलेले दोन्ही जॅकवेलचे काम तात्काळ कसे पूर्ण होईल यावर भर देऊन त्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर इंटेक वेल आणि इन्स्पेक्शन वेलचही काम लवकरच केले जाणार आहे.

यापूर्वी ६४६ मीटर कॉपर डॅमची उंची होती मात्र आता दोन मीटरने कॉपर डॅमची उंची वाढवली असून ६४८ मीटरचा कॉपर डॅम करण्यात आलाय. यामुळे यावेळी जास्त दिवस काळ काम करण्यास मिळणार आहे.

या योजनेच्या ५२ किमी पाईपलाईन टाकण्याच्या कामांपैकी ४९ किमी पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सोबतच धरण क्षेत्रातील ४२ टक्के काम पूर्ण झाले असून जॅकवेलच्या दोन राफ्टचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.

सध्या जॅकवेलचे काम आव्हानात्मक असून मनुष्यबळ वाढवून हे काम पूर्ण केले जाणार आहे. बिद्री येथील महावितरणच्या उपकेंद्रापासून धरणपर्यंत ३३ किलो मीटर अंतराची विद्युत वहिनी टाकण्याचे काम सुरू असून महिनाभरामध्ये पूर्ण होईल.

या योजनेच्या कामाला आवश्यक असलेल्या सर्व मंजुऱ्या मिळाल्या असून आता उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी प्रत्येक आठवड्याला आयुक्तांकडून आढावा घेतला जाणार आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे या कामाला सुमारे सव्वा वर्ष फटका बसला. परंतु, आज या योजनेच्या सर्व कामांची माहिती घेतली असून उर्वरित कामे प्राधान्याने करण्याचे नियोजन केले असून ही योजना जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

यावेळी आमदार प्रकाश अबिटकर, आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, प्रकल्प अभियंता हर्षजित घाटगे, सल्लागार अभियंता व्ही. एस. नलावडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, रोहित बांदिवडेकर, उपअभियंता भाग्यश्री पाटील, कल्याणी कालेकर, प्रशांत कांबळे, शाखा अभियंता एच. बी. कुंभार, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, अर्जुन माने, सचिन पाटील, सुनील पाटील, अशपाक आजरेकर, माजी नगरसेविका माधुरी लाड आदी उपस्थित होते.5 views0 comments

Comments


bottom of page