आज कोल्हापूर हायस्कूलच्या १९८५-८६ च्या १० वी बॅचच्या ९ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यामध्ये सहभागी होऊन उपस्थितांशी संवाद साधला. आपल्या सर्वांनाच शाळेतील दिवस आणि वर्गातील मित्र-मैत्रिणी सोबतचे अनुभव विशेष असतात. या धकाधकीच्या जीवनात अशा प्रकारे वर्षातून एकदा त्या लहानपणीच्या आठवणींनीना उजाळा देण्यासाठी असे स्नेहसंमेलन आयोजित करणे महत्वाचे ठरते.
यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर रामाणे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. हिरेमठ सर, गडकरी सर, कल्रेकर सर, केसरकर सर, रेडेकर सर, बी.डी. पाटील सर, एस.डी. पाटील सर, तसेच श्रीकांत मनोळे, सुरेश बाडेकर, रफिक जमादार, दीपक पाटील, संग्राम जाधव, विठ्ठल पाटील, संजय भाकरे, कुमुद कुलकर्णी, सरला पोवार, शोभा पपेडणेकर, उज्वला मांगलेकर, तसेच सर्वच माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Commentaires