आज कोल्हापूर विमानतळाला भेट देऊन या ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. कोणत्याही शहराच्या प्रगतीसाठी त्याचे दळणवळण सुविधा सक्षम असणे गरजेचे आहे. याचसाठी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब कोल्हापूरमध्ये अद्यावत सुविधेसह विमानतळासाठी व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांमुळे सध्या विमानतळाचा विकास झपाटयाने होत असून प्रवाशांच्या संख्येतही लक्षणिक वाढ झाली आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नाईट लँडिंग तसचं मुरूम आणि भराव टाकून विस्तृत धावपट्टी निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्मिनल बिल्डिंग बांधकाम असे अनेक कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. ही कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी सध्या लगबग सुरू आहे. त्या अनुषंगाने आज विमानतळाला भेट देऊन कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांच्या कडून या सर्व कामांचा आढावा घेतला.
सध्या विमानतळाच्या विस्तारीकरणामध्ये, धावपट्टी बनवण्याचे काम देखील सुरू आहे. आगामी काळात याठिकाणी एअर बस आणि बोईंग या कंपनीची मोठी विमाने उत्तरावी त्यादृष्टीने विमानतळाचे विस्तारीकरण सुरू आहे. सध्या विमानतळावरून हैदराबाद, बेंगलोर, तिरुपती विमान सेवा सुरू आहे. तर लवकरच दिल्ली आणि अहमदाबाद या शहरांनाही विमान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती संचालक कटारिया यांनी दिली.
विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून विस्तारीकरणाचे काम गतीने करण्याचे व प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, बालाजी इन्फ्राटेकचे रिजनल डायरेक्टर शंभूराजे मोहिते, गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगुले, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments