कोल्हापूर विमानतळ येथील उजळाईवाडी - तामगाव डायव्हर्जन रस्त्याची पाहणी केली.
- Nilesh Patil
- Nov 21, 2019
- 1 min read
कोल्हापूर विमानतळ येथील उजळाईवाडी - तामगाव डायव्हर्जन रस्त्याची पाहणी मा. जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार सतेज (बंटी) डी. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या समवेत केली.
तामगाव- उजळाईवाडी डायव्हर्जन रस्त्याबाबतचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता पर्यायी मार्गाचा सर्वे करून भूसंपादचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा, अशा सूचना आमदार सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी, प्रांत अधिकारी वैभव नावाडकर, करवीर तहसीलदार शीतल भांबरे, तेज घाटगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले, शशिकांत खोत तसेच उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगांव गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments