top of page
Search

कोल्हापूर विमानतळाच्या प्रलंबित कामांबाबत विमानतळच्या प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला.

Writer's picture: Nilesh PatilNilesh Patil

कोल्हापूर विमानतळाच्या प्रलंबित कामांबाबत विमानतळच्या प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी विमानतळ अंतर्गत करण्यात येणारे सुशोभिकरण, नाईट लँडिंगसाठी करावी लागणारी विविध उपाययोजना, धावपट्टीचे विस्तारीकरण तसंच अन्य विकास कामांबाबत विमान प्राधिकरणाचे अधिकारी कमल कटारिया यांच्याशी चर्चा केली. यावेळी आर्किटेक्ट महेश नामपूरकर यांच्यासह विमान प्राधिकरणाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

तसेच कोल्हापूर विमानतळावर होणाऱ्या मोठ्या विमानांच्या नाईट लँडिंगमध्ये काही अडथळे येत आहेत. या अडथळ्यांबाबत दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री ना. सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळी पालकमंत्री ना. सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, व विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन अडथळ्यांची पाहणी केली. जे अडथळे हटवणं तत्काळ शक्य आहे ते त्वरित हटवन्याबाबत्चा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

-आ. ऋतुराज पाटील



7 views0 comments

Comments


bottom of page