top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

कोल्हापूर दक्षिण मधील कोरोना परिस्थितीचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.

पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूर दक्षिण मधील कोरोना परिस्थितीचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.

या बैठकीमध्ये पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी खालील मार्गदर्शक सूचना केल्या.

१) कोव्हीड संकटात प्रत्येकाने दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करून काम करावे.

२) कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन १५ वर्षा आतील मुलांची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना करणे सुरू आहे. तर संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास कोव्हीड सेंटरसाठी आपल्या भागातील मंगल कार्यालयाची माहिती घेऊन ठेवावी, राजोपाध्ये नगर, दुधाळी येथील कोविड सेंटर ही लहान मुलांसाठी ठेवण्याबाबत विचार करावा,

३) इस्पुर्ली येथे कोव्हीड सेंटर सुरू करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

४) कोल्हापूर शहरात कोरोनाबधितांची संख्या लक्षात घेऊन शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच महापालिकेकडून संजीवनी अभियान राबवले जात आहे, यालाही सहकार्य करून याबाबत नागरिकांना प्रबोधन करावे.

या बैठकीमध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यानी आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी मी केले असून दक्षिण मतदार संघातील प्रत्येक गावात उपाययोजना राबवल्या जात आहेत. गांधीनगर इथल्या आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित होत आहे. त्यामुळे कोरोना मुक्तीसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे यावेळी सांगितले.

या आढावा बैठकीत माजी नगरसेवक शरंगधर देशमुख, भूपाल शेटे, प्रतापसिंह जाधव, राहुल माने, सुरेश ढोणूक्षे, दुर्वास कदम, संदीप कदम, दिग्विजय मगदूम, सर्जेराव साळोखे, सुजित पाटील, अनुप पाटील, अश्पाक आजरेकर, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, दऱ्याचे वडगावचे सरपंच अनिल मुळीक, प्रकाश शिंदे, गजानन पाटील, विजय नाईक, अमर मोरे, नारायण गाडगीळ, जंबु उपाध्ये यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली.

- आ. ऋतुराज पाटील



5 views0 comments

Comments


bottom of page