top of page

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेसोबतच विविध योजना प्रभावीपणे राबविण्या .......

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Oct 9, 2020
  • 1 min read

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेसोबतच विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात शासकीय अधिकारी व नवनिर्वाचित कमिटी सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सविस्तर चर्चा केली.

यावेळी, संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नवनिर्वाचित कमिटी सदस्यांशी संवाद साधून सदर योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्याच्यासंदर्भात योग्य नियोजन करण्याचे सूचित केले. सोबतच, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या योजनांसाठी आठवड्याला एक दिवस राखीव ठेऊन या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना करून देण्याच्या सूचना दिल्या. या योजनेतील प्रलंबित प्रकरने सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत ही यावेळी सांगितले.

या बैठकीला, करवीर तहसीलदार शीतल भांबरे-मुळे, नायब तहसीलदार परशुराम उरकुडे, दक्षिण मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, संतोष कांबळे, शिवाजी राजगिरे, संगीता चकरे उपस्थित होत्या.

- आ. ऋतुराज पाटील



 
 
 

Comments


bottom of page