कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अजिंक्यतारा कार्यालय येथे मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघात निवडणुकीपूर्वी निराधारांच्या पेन्शन योजनेचा प्रश्न हाती घेतला होता, आज या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करीत असतांना आनंद आणि समाधान आहे. कोरोनाच्या या काळात योजना तळागाळात पोचविणे हे आव्हान असतांना समिती सदस्य या योजना गरजूपर्यंत पोचवत आहेत. या शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोचतील यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडून मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तसेच या योजनेच्या कमिटी सदस्यांनी समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी केले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात एकही नागरिक या शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, हा आमचा प्रयत्न आहे. सध्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कोल्हापूर शहरासह ३६ गावातील १७३ लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, कमिटी सदस्य संतोष कांबळे, कमिटी सदस्या संगीता चक्रे, शिवाजी राजिगरे, पवन वाठारकर यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments