आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सांगवडे गावातील ड्रेनेज आणि रस्ते अशा विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे मतदारसंघातील विकास कामांवर काही प्रमाणात मर्यादा आल्या होत्या. पण, करवीर निवासानी आई अंबाबाईच्या कृपेने कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. परंतु, जो पर्यंत यावर इलाज उपलब्ध होत नाही तोपर्यंत खबरदारी घेणे आवश्यक आहे. गेल्या ८ महिन्यांपासून थांबलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.
यावेळी, जि.प.सदस्य सौ. वंदना पाटील, पं.स.सदस्य सौ.शोभा राजमाने, सरपंच सौ. माने, विजय पाटील, गौतम पोवार, दादा घाटगे, सुकुमार जगनाडे, सचिन रावळ, रामगोंड पाटील, राजू जाधव, नेमिनाथ माने, पिंकू जिरगे, सचिन माने, प्रवीण माने, सचिन भावके, उत्तम कुंभार, रोहित पाटील, नाना पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते,
- आ. ऋतुराज पाटील
Comments