top of page

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विविध गावचे सरपंच आणि सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे 2 तास संवाद

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Aug 7, 2020
  • 1 min read

कोरोना व कोल्हापुरातील संभाव्य पूर परिस्थिती संदर्भात आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विविध गावचे सरपंच आणि सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे 2 तास संवाद साधला. कोल्हापूरवर कोरोना व पूर असे दुहेरी संकट ओढवले असल्याने प्रत्येकाने सतर्क राहवून योग्य व तात्काळ उपायोजना करणे गरजेचे आहे.

यावेळी, या दोन्ही संकटांशी सामना करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व कराव्या लागणाऱ्या उपायोजनांबद्दल सर्वांची मते समजावून घेतली. सर्व गावातील सरपंचांनी अतिशय मुद्देसूद मते व्यक्त केली. तसेच, या संकटांना सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले तर आपण नक्कीच या दोन्ही संकटांवर मात करू शकतो असा विश्वास सर्वांना यावेळी दिला.

- आ. ऋतुराज पाटील



 
 
 

Comments


bottom of page