top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गिरगावमधील कोव्हीड सेंटरला भेट दिली.

आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गिरगावमधील कोव्हीड सेंटरला भेट दिली. या कोव्हीड सेंटरची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून १० लिटर क्षमतेचा ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून दिला. या माध्यमातून येथे येणाऱ्या रुग्णांची सोय होणार आहे.

गिरगाव येथील युवकांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गिरगाव-पाचगाव इथल्या राजर्षी शाहू निवासी शाळेमध्ये शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर सुरू करून आदर्शवत पाऊल टाकले आहे. यामुळे या परिसरातील कोरोना रुग्णांना चांगली सेवा मिळेल असा विश्वास विश्वास आहे. याठिकाणी योग्य सुविधा देण्यासाठी आम्ही प्राधान्याने प्रयत्नशील आहोत.

या कोवीड केंद्रावरील स्वयंसेवकांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, फेस शिल्ड, पॉकेट सॅनिटायझर, ग्लोव्हज साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी, सेंटरचे समन्वयक रुपेश पाटील, पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच जालंधर पाटील, माजी सरपंच दिलीप जाधव,ग्रामसेवक पूनम कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, उत्तम विष्णू पाटील, उत्तम बापू पाटील, जालिंदर पाटील, सुभाष पाटील, निलेश सुतार, ज्ञानेश्वर साळोखे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांच्यासह गिरगावमधील युवक, माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील



4 views0 comments

Comments


bottom of page