कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कोरोनामुक्त होऊन घरी गेलेले आणि ज्यांना काही दिवसासाठी ऑक्सिजन द्यावा लागणार आहे, अशा रुग्णांसाठी आम्ही ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर ही सुविधा मोफत उपलब्ध केली आहे.
आज संभाजीनगर येथे एका कार्यक्रमासाठी गेलो असता जवळच असणाऱ्या श्री.अजयकुमार यादव यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरच्या वापराबद्दल माहिती घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
हे मशीन चांगल्या प्रकारे काम करत असून याचा रेकव्हरीसाठी फायदा होत असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले. आपण एखादे काम मनापासून केले तर लोकांना अडचणीच्या काळात त्याचा चांगला उपयोग होतो हे पाहून मनाला समाधान वाटले.

Comments