Search

कोल्हापूर दक्षिणमधील कणेरी येथे श्री. काडसिद्धेश्वर महाराज यांच्या ‘गुरुकुल विद्यालयाला भेट दिली.

कोल्हापूर दक्षिणमधील कणेरी येथे श्री. काडसिद्धेश्वर महाराज यांच्या ‘गुरुकुल विद्यालयाला भेट दिली. सद्याच्या शिक्षणपद्धतीला फाटा देत पारंपरिक पद्धतीने मुला-मुलींना शंभर टक्के स्वयंपूर्ण बनविण्यासाठी चार वेद, सहा शास्त्र आणि ६४ प्रकारच्या कला शिकविणारे हे देशातील एकमेव विद्यालय आहे. संपूर्ण देशातून सध्या ३२५ विद्यार्थी येथे विनामूल्य शिक्षण घेत आहेत. आज या विद्यालयातील अनेक अनोख्या उपक्रमांबद्दल श्री. काडसिद्धेश्वर महाराज यांनी मला विस्तृतपणे माहिती दिली आणि काही विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके पण करून दाखविले. या गुरुकुलमध्ये राबवित असलेल्या या अनोख्या शिक्षणपद्धतीने मी खरचंच भारावून गेलो, यावेळी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.1 view0 comments