गेली दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनाचे हे संकट जगावर आलेले आहे. या संकटाच्या काळामध्ये फ्रन्टलाइन वर्कर्सनी केलेले काम हे नेहमीच लक्षात राहणारे आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, डॉक्टर, नर्स आदी घटक अविरतपणे कोरोनाचा सामना करत आहेत.
त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनिस, आरोग्य सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी अधिकारी या सर्वांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना सुरक्षित करण्यासाठी धाडसाने दीड वर्ष काम केले आहे. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका मदतनीस अगदी घरोघरी जाऊन लोकांची माहिती घेण्याचे काम करत आहेत.
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी गरजूंना मदत ही संकल्पना घेऊन माझा वाढदिवस साजरा करावा, अशी विनंती कार्यकर्ते, हितचिंतक यांना केली होती. या माध्यमातून या सर्वांनी आपल्या गावातील आणि परिसरातील गरजू लोकांना धान्य वाटप, फूड पॅकेट वाटप त्याचबरोबर इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा वाटप केलेले आहे.
माझ्या सर्व मित्रांनी कोल्हापूर दक्षिणमतदार संघातील ऑनलाईन वर्करसाठी 6 हजार वाफेचे मशीन दिली आहेत. त्यातीलच कळंबा गावामधील फ्रंट लाईन वर्कर साठी 75 मशीनचे आज वाटप करण्यात आले. कोरोनाचे हे संकट दूर होवो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
Comments