कोल्हापुरातील श्रीमती रेखा दुधाणे काकी या महाराष्ट्रातील पहिल्या लायसन्स धारक रिक्षाचालक. गेली 30 वर्षे धैर्याने आणि चिकाटीने रिक्षाचालक म्हणून काम करताना त्यांनी संसाराला आकार तर दिलाच पण लोकांची सेवा करण्याचे व्रत जपले.
अधिवेशनासाठी मुंबईला जावे लागणार असल्याने उद्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची आज भेट घेऊन त्यांचा प्रवास जाणून घेतला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या रिक्षातून फेरफटकाही मारला. दुधाणे यांनी 30 वर्षापूर्वी निवडलेली वेगळी वाट आजही वेगळ्या क्षेत्रात जाऊ पाहणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
- आ. ऋतुराज पाटील
Commentaires