Search

कोल्हापुरातील श्री देवी इंदूमती बोर्डिंगची नूतन इमारत श्रीमंत शाहू महाराज यांच्या शुभहस्ते...

स्वर्गीय परशुराम जाधव बापू यांच्या स्मरणार्थ सरोज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने बांधण्यात आलेली कोल्हापुरातील श्री देवी इंदूमती बोर्डिंगची नूतन इमारत श्रीमंत शाहू महाराज यांच्या शुभहस्ते आज बोर्डिंग व्यवस्थापनाकडे सुपुर्द करण्यात आली.

आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम झाला हा एक चांगला योगायोग आहे. लोकराजा शाहू महाराजांनी आपल्या 48 वर्षांच्या जीवनामध्ये समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. समाजातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी बोर्डिंगची स्थापना केली. त्यामुळे कोल्हापूर शहराची विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची नगरी अशी ओळख त्या निमित्ताने निर्माण झाली.

1919 साली चर्मकार व कक्कया समाजातील मुलांसाठी शाहू महाराजांनी बोर्डिंगची स्थापना केली. आणि त्यासाठी लक्ष्मीपूरीतील जागा, खर्चासाठी विशेष अनुदानही दिले. शाहू महाराजांच्या या दूरदृष्टीमुळे या चर्मकार व कक्कया समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

या इमारतीला सुमारे 125 वर्षे पूर्ण झाल्याने या इमारतीची डागडूजी करणे गरजेचे होते. त्यासाठी सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक दिपक जाधव आणि भरत जाधव यांनी आपले वडील आदरणीय बापू जाधव यांच्या स्मरनार्थ ही इमारत बांधून दिली.

कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा हे अनोखे उदाहरण आहे. आदरणीय बापूंनी सरोज ग्रुपच्या माध्यमातून हजारो कुटूंबांना उभारी दिली आणि त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे काम जाधव बंधूंनी केले आहे. याबद्दल जाधव परिवाराला मी मनापासून आभारी आहे.

यावेळी, पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक दिपक जाधव व भरत जाधव, श्री देवी इंदूमती बोर्डिंगचे चेअरमन दुर्वास कदम, माजी उपमहापौर भूपाल शेटे, बोर्डिंगचे व्हाईस चेअरमन किशोर कटके, अरुण सातपुते, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, माजी नगरसेविका वृषाली कदम, समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, अनिल घाटगे यांच्यासह बोर्डिंगचे सर्व संचालक उपस्थित होते.4 views0 comments