Search

कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे नुकताच लागलेल्या आगीमुळे नुकसान झालेल्या झाडांची पाहणी करून संबंधित..

कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे नुकताच लागलेल्या आगीमुळे नुकसान झालेल्या झाडांची पाहणी करून संबंधित अधिकारी, पाचगाव, मोरेवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी यांची बैठक घेऊन खालील उपायोजना करण्यात आल्या आहेत.

१) या आगीची सुमारे २५ हजार झाडांना झळ पोचली असून यातील लहान आकाराची सुमारे तीन हजार झाडे पूर्णपणे जळाली आहेत, उर्वरित झाडांना जर पाणी दिले तर ती झाडे जगातील. या झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून डी वाय पाटील ग्रुपकडून दरोराज पंधरा टँकरद्वारे पाणी झाडांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

२) नुकसान झालेल्या झाडांच्या संवर्धनासाठी वनमंत्री ना. संजय राठोडजी यांच्याकडून तात्काळ निधी उपलब्ध करणार.

३) कोल्हापुरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि युवकांच्या सहभागातून या झाडांचे मल्चिंग करण्याचे नियोजन केले जाणार आहे.

४) हा भाग नागरी वस्तीच्या जवळ असल्याने कचरा जाळल्याने हा प्रकार घडला असून या संपूर्ण जमिनी भोवती कुंपण घालण्याची सूचना यावेळी केली.

यावेळी पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, मोरेवाडी सरपंच दत्तात्रय भिलुगडे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एस.आर .शिंदे, सहाय्यक वन संरक्षक एम.बी. चंदनशिवे, उद्यान विभाग प्रमुख डॉ एस.व्ही. सावंत, करवीरचे वनपाल एस. बी. देसाई यांच्यासह पाचगाव, मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आणि वृक्षप्रेमी उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments