Search

कोल्हापुरातील विश्ववती आयुर्वेदीक चिकीत्सालय व रिसर्च सेंटरच्यावतीने उभारण्यात आलेल्या...

बरेचदा कोरोनातून बरे झाल्यानंतर काही नागरिकांना अनेक आरोग्याच्या तक्रारी जाणवत असल्याचे दिसून आले आहे. अशा नागरिकांना आयुर्वेदीक पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी कोल्हापुरातील विश्ववती आयुर्वेदीक चिकीत्सालय व रिसर्च सेंटरच्यावतीने उभारण्यात आलेल्या पोस्ट कोव्हीड सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या सेंटरमध्ये आयुर्वेदीक उपचार केले जाणार असल्याने पोस्ट कोव्हीड रूग्णांना नक्की दिलासा मिळणार आहे. यावेळी, विश्ववतीचे आनंदनाथ सांगवडेकर, निरंजनदास सांगवडेकर, वैद्य समीर गोविंद जमदग्नी, वैद्य हर्षदा देसाई, आशुतोष भडसावळे यांच्यासह रूग्णालयाचे इतर वैद्य आणि कर्मचारी उपस्थित होते.2 views0 comments