कोल्हापुरातील परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लसीकरण प्राधान्याने करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली होती. या विनंतीनुसार उद्या कोल्हापूर शहरातील 94 विद्यार्थ्यांचे लसीकरण सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे होणार आहे.
तसेच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू असून लवकरच त्यांचे सुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे. माझ्या विनंतीची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाने या विद्यार्थ्यांचे लसीकरण विषय मार्गी लावल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक आभार!

Comments