कोल्हापुरातील निवृत्ती कक्ष अधिकारी मा. श्री. जगन्नाथ सनगर यांचे आत्मचरित 'बुरुज' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला.
सन्मानीय सणगरजी यांचा जीवन प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे. गारगोटी येथील मौनी विद्यापीठ शाळेत त्यांनी १० वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे शिकण्याची इच्छा असूनही परिस्थिती मुळे त्यांना मुंबईत जाऊन काम करावे लागले. याही परिस्थितीत त्यांनी परीक्षा देऊन मंत्रालयात अर्थ विभागात नोकरी मिळवली आणि कक्ष अधिकारी या पदापर्यंत ते पोहोचले. त्यांनी खूप संघर्ष करून आपल्या आयुष्याला आकार दिला. आपला संसार आणि नोकरी सांभाळताना त्यांनी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत काम केले. या सर्व गोष्टी सांभाळताना आपल्या सनगर समाजासाठी मोलाचे काम केले. समाजासाठी 9 पेक्षा जास्त संस्था स्थापन केल्या. समाजातील अनेक मुलांना शासकीय नोकरी लावण्यासाठी सहकार्य केले.
एखाद्या खेडेगावातून पुढे येऊन मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहून आपला जीवन प्रवास यशस्वी करणाऱ्या सनगर साहेब यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- आ. ऋतुराज पाटील
Comments