top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

कोल्हापुरातील जिल्ह्यातील थोरला दवाखाना म्हणजेच सीपीआर रुग्णालय हा कोरोना काळात कोविड रुग्णां.......

कोल्हापुरातील जिल्ह्यातील थोरला दवाखाना म्हणजेच सीपीआर रुग्णालय हा कोरोना काळात कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवल्याने जिल्ह्याचा आरोग्य सेवेचा भार लाईन बाजार, कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयवर आला. या कठीण काळातही सेवा रुग्णालयाने रुग्णांना दिलेली आरोग्य सेवा, ही कौतुकास्पद आहे.

नॅशनल हेल्थ मिशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार कोल्हापुरातील सेवा रुग्णालयाला मिळाला. या प्रकारचा पुरस्कार मिळवणारे हे रुग्णालय जिल्ह्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे. आज या रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल माळी, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उमेश कदम, माजी महापौर स्वाती येवलुजे, नगरसेविका माधुरी लाड, नगरसेवक अशोक जाधव, मोहन सालपे, सुभाष बचडे, श्री राम सोसायटीचे चेअरमन धनाजी गोडसे, उद्योजक डी.डी पाटील, डॉ.डी.पी वाडकर यांच्यासह सेवा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील



5 views0 comments

Comments


bottom of page