top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

कोल्हापुरातील अशाच 'मौरी टेक' या मल्टिनॅशनल आयटी कंपनीला भेट देऊन कोल्हापुरातील आयटी क्षेत्राबद्दल..

कोल्हापूर ही कलानगरी, क्रीडानगरी आणि उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते, पण याचसोबत या २१ व्या शतकातील आधुनिक अशा आयटी क्षेत्रासाठीचे सुद्धा प्रमुख केंद्र बनावे यासाठी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत.

कोल्हापूरमध्ये सुसज्जसे आयटी पार्क उभारणीसाठी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब प्रयत्नशील आहेत. मला विश्वास आहे, येणाऱ्या अल्पकाळातच कोल्हापूरमध्ये मल्टीनॅशनल आयटी कंपन्या पाहायला मिळतील.

आज, कोल्हापुरातील अशाच 'मौरी टेक' या मल्टिनॅशनल आयटी कंपनीला भेट देऊन कोल्हापुरातील आयटी क्षेत्राबद्दल सविस्तर चर्चा केली. २००५ मध्ये स्थापन झालेली मौरी टेक कंपनी आज तब्बल ८ देशांमध्ये ३ हजारांहून अधिक कर्मचारी असलेली मल्टीनॅशनल कंपनी बनली आहे.

आयटी क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेल्या कोल्हापुरातील युवक-युवतींना कोल्हापुरातच जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा करता येतील याबाबत यावेळी सविस्तर चर्चा केली. सोबतच, कोल्हापुरातील आयटी पार्कमध्ये मल्टीनॅशनल आयटी कंपन्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा, प्लग अँड प्ले सुविधा, कुशल मनुष्यबळ आदी बाबींबत यावेळी चर्चा झाली.

कोल्हापुरातील युवक-युवतींना कोल्हापुरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ना. सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या 'मिशन रोजगार' उपक्रमांबाबत सविस्तर माहिती यावेळी कंपनीच्या संचालकांना दिली.

यावेळी, मौरी टेकचे संचालक सुरेश सुतार, सहकारी संचालक अभिजीत अलोणे, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील



9 views0 comments

Comments


bottom of page