top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

कोल्हापूर जिल्ह्यात अडकून पडलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांना घरी पाठविण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था.

काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांनी स्थलांतरित मजुरांचा प्रवास खर्च प्रदेश काँग्रेस कमिटी उचलतील अशी घोषणा केली होती. या निर्णयाला अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने राज्यातील स्थलांतरित मजुरांचा प्रवास खर्च उचलण्याचा सकारात्मक निर्णय घेतला.

लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अडकून पडलेल्या मध्यप्रदेशातील १०६६ मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्यासाठी कोल्हापूर ते जबलपूर (मध्य प्रदेश) या विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष ना. सतेज (बंटी) पाटीलजी यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व श्रमिकांच्या प्रवासादरम्याचा खाण्यापिण्याचा खर्च कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मार्फत करण्यात आला आहे. या सर्व श्रमिकांची यात्रा सुखद होवो हीच मनोकामना.

यावेळी, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, महापौर सौ. निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ. संध्या घोटणे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. - आ. ऋतुराज पाटील











4 views0 comments
bottom of page