कोल्हापूर जिल्ह्याचा २०२०-२१ या सालाकरिता खरीप हंगामपूर्व बैठकीत सहभागी
आज कोल्हापूर जिल्ह्याचा २०२०-२१ या सालाकरिता खरीप हंगामपूर्व बैठकीत सहभागी झालो. मा. पालकमंत्री, जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीत, या खरीप हंगामामध्ये मा. कृषिमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार, शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांचा योग्य आणि पुरेसा पुरवठा करण्याबाबत कृषिविभागाने योग्य नियोजन करावे, अशी सूचना मांडली. - आ. ऋतुराज पाटील



