कोल्हापूर जिल्ह्याचे महापूरामुळे प्रचंड असे नुकसान झाले आहे, यामध्ये शेतकरी, व्यापारी तसेच.........
पश्चिम महाराष्ट्राचे खास करून कोल्हापूर जिल्ह्याचे महापूरामुळे प्रचंड असे नुकसान झाले आहे, यामध्ये शेतकरी, व्यापारी तसेच कारागीर बांधवांचे झालेले नुकसान, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्यकेंद्रे इमारती, शासकीय कार्यालय इमारतीं, अंगणवाडी इमारती, कोल्हापूर शहरातील रस्ते अशा विविध बाबींचा समावेश आहे. याबाबतची वस्तुस्थिती मांडण्याची संधी आज मला मिळाली, तसेच यासाठी लागणारा निधी लवकरात लवकर वर्ग करण्याची विनंती यावेळी शासनाला केली.