कोल्हापूर जिल्ह्याची खरीप हंगाम 2021च्या नियोजनासाठी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील,....
कोल्हापूर जिल्ह्याची खरीप हंगाम 2021च्या नियोजनासाठी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या बैठकीत सहभागी झालो.
बाजारपेठेचा कल ओळखून मूल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी 'विकेल ते पिकेल' हा कृषी विभागाचा उपक्रम अभिनंदनीय आहे. या अभियान अंतर्गत परवा कसबा बावडा येथे एका अपार्टमेंट मध्ये आलेल्या अधिकारी आणि शेतकऱ्यांशी मी याबद्दल चर्चा केली. शेतकरी या योजनेबद्दल खूप भरभरून बोलत होते. यामुळे त्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला चांगला दर मिळत आहे आणि ग्राहक सुद्धा ताजा भाजीपाला मिळत असल्यामुळे खुश आहेत.
फक्त या शेतकऱ्यांना आपल्या गावातून ही भाजी विकायला येताना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारी आय कार्ड लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावीत. तसेच खरीप हंगाम पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खते उपलब्ध व्हावे, यासाठी योग्य नियोजन व्हावे, आदी सूचना मांडल्या या बैठकीमध्ये मांडल्या.
- आमदार ऋतुराज पाटील