आज मा. पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे रिक्षाचालक अनुदान नाव नोंदणी सुविधा सुरू करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवाना धारकांना रु. १५००/- चे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा व्यावसायिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे.
ही मदत कोल्हापुरातील सर्व पात्र रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने काँग्रेस भवन येथे रिक्षाचालकांसाठी नोंदणी सुविधा सुरू केली आहे.
यासाठी ऑटोरिक्षा वाहन क्रमांक, रिक्षाचे परमिट, आर.सी. बुक, लायसन्स, बँक पासबुक आणि आधार क्रमांक सोबत घेऊन काँग्रेस कमिटीमध्ये यावे. ही ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित माहितीची पडताळणी झाल्यानंतर रिक्षा चालकांना खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात येईल.
यावेळी, आमदार चंद्रकांत जाधव, गुलाबराव घोरपडे, संजय वाईकर, दिपक थोरात, ऋषिकेश पाटील, विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार, सचिन चावरे, आनंदा करपे, अक्षय शेळके, उदय पवार, विनायक पाटील, सुदर्शन तुळसे, आदित्य कांबळे, स्नेहा पाटील, आदी सहकारी उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments