कोल्हापूरची सुकन्या कु. अनुप्रिया अमितकुमार गावडे हिने अवघ्या 8 वर्षे 8 महिने एवढ्या कमी वयात भारतीय घटनेतील प्रस्तावना भाग 1, 2 आणि 3 मधील 35 कलमे आणि उपकलमे अवघ्या 6 मिनिटे 10 सेकंदात पठण करण्याची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात अशी कामगिरी करणारी ती एकमेव ठरली आहे.
या कामगिरीमुळे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिने आपले नाव नोंदवले आहे.
तिच्या या यशाबद्दल आयोजित प्रेस काँफरन्सवेळी तिचा यथोचित सत्कार करून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनुप्रियाला सतत प्रोत्साहन देणारे तिचे आईवडील आजी आणि कुटुंबीय यांचे देखील अभिनंदन केले.
एकीकडे बेटी बचाओ,बेटी पढाओ हे सांगावे लागत असताना गावडे कुटुंबियानि बेटी को सपोर्ट करो और दुनिया मे आगे लाओ, हा संदेश दिला आहे.
- आ. ऋतुराज पाटील
Comments