कोल्हापूरच्या पूजा सावंत यांची " उमेद "अभियानाच्या COMMUNITY RESOURCE PERSON म्हणून निवड झाल्याबदल आयोजित कार्यक्रमात सहभाग घेऊन उपस्थितांशी संवाद साधला.
महिला बचत गटाची चळवळ आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात रुजली आहे. यामुळे अनेक माता-भगिनींना उद्योग व्यावसासाठी आर्थिक मदत झाली आहे. महाराष्ट्र शासनामार्फत " उमेद " अभियान महिला बचत गटांसाठी राबवले जाते. या अभियानामार्फत गटांना भांडवल तसेच बेरोजगारांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले जाते. तसेच समाजातील गरजू घटकांना शासकीय योजनाचा लाभ या अभियान मार्फत मिळवून दिला जातो. बचत गट आणि शासकीय योजना यामधील महत्वाचा दुवा म्हणून CRP कार्यरत असते. आमच्या भगिनी पूजा ताईं सावंत यांच्या माध्यमातून आपल्या हक्काची व्यक्ती या योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी मिळालेली आहे. पूजा ताई या पदाचा चांगल्या प्रकारे न्याय देतील असा मला विश्वास वाटतो. पूजा ताईंना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
यावेळी, सुजित चव्हाण, स्वाती चव्हाण, संगीत चव्हाण, सरपंच सुवर्णा माने, अजित पोतदार, भूषण कांबळे, प्रकाश सूर्यवंशी, टिपू मकानदार, विलास देगणाळ तसेच आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments