top of page

कोल्हापूरच्या जनतेच्या भल्याचे जास्त निर्णय या अधिवेशनात व्हावेत यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असू.

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Feb 24, 2020
  • 1 min read

आजपासून विधिमंडळांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली. महाविकास आघाडीच्या या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्पासोबतच अनेक महत्वाची विधेयके सादर होणार आहेत.

या संपूर्ण अधिवेशनामध्ये, मी आपल्या मतदारसंघातील व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मुद्दे सभागृहात मांडायचा प्रयत्न करणार आहे, तसेच मा. गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मंत्रीमहोदयांना भेटून त्यांच्या खात्याशी संबंधित विषयांचा पाठपुरावा करणार आहे.

कोल्हापूरच्या जनतेच्या भल्याचे जास्तीत जास्त निर्णय या अधिवेशनात व्हावेत यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असू.

यामुळे, २० मार्च पर्यंत शनिवार,रविवार वगळता इतर दिवस मी कोल्हापुरात उपलब्ध असणार नाही. पण, या कालावधीत आपले कोणतेही काम असल्यास वा कोणतीही अडचण आल्यास आपण अजिंक्यतारा कार्यलयाशी संपर्क करावा. टीम अजिंक्यतारा आपल्यासाठी सदैव उपलब्ध असेल.

आ. ऋतुराज संजय पाटील

संपर्क: अजिंक्यतारा कार्यालय, २१/२६, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर ०२३१-२६५३२८९/९०


 
 
 

Comments


bottom of page