कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधात्मक उपयोजना आणि लसीकरण संदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
यावेळी, वय वर्षे ४५ ते ६० आणि वय वर्षे ६० वरील उर्वरित नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली असून साधारणपणे ८२ हजाराहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.
१ मे पासून वय वर्षे १८ वरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यास सुरवात केली जाणार आहे. यासंदर्भात महानगरपालिकेतर्फे 'ई-टोकन' प्रणाली उपलब्ध करण्यात येणार असून यामुळे गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करून लसीकरण करता येणार आहे.
१ मे नंतर कोल्हापूरमध्ये लस कमी पडू नये यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी पत्र व्यवहार करून पुरेशी लस उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
यासोबत, लसीकरण केल्यानंतर पुढील ६० दिवस 'रक्तदान' करता येत नाही, त्यामुळे जिल्ह्यामध्ये पुढील काळामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सर्वांनां माझी कळकळीची विनंती आहे, लसीकरण करण्याआधी रक्तदान करा.
कोल्हापूर शहरातील सर्व नागरिकांना सुलभ आणि सोयीस्कररीत्या लसीकरण करता येईल अशा पद्धतीने योग्य आणि काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
या बैठकीला, उपायुक्त निखिल मोरे, उपायुक्त रविकांत अडसूळ, आरोग्य अधिकारी डॉ. पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल कुमार माने उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments