Search

"कोरोनाची लस घेऊया, कोल्हापूरला कोरोनामुक्त करूया".

आज १६ मार्च, भारतात दरवर्षी हा दिवस 'राष्ट्रीय लसीकरण दिवस दिन' म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर, कोल्हापुरातील सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथे भेट देऊन कोरोना लसीकरण संदर्भात केंद्रातील डॉक्टर, नर्सेस आणि लस घ्यायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी, लस घेण्याची नोंदणी प्रक्रिया, लसीकरण केंद्रामध्ये येताना तसेच लस घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी आदींबाबत केंद्रातील डॉक्टरांशी आणि नर्सेस यांच्याशी सविस्तर संवाद साधला. याचसोबत लस घेतलेल्या नागरिकांशी त्यांच्या अनुभवाबाबत चर्चा केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच सर्वच कोरोना योद्धे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा अतिशय प्रभावी उपाय आहे. विशेषत: कोविड-19 साथीच्या रोगादरम्यान आपल्या सर्वांनाच लसीचे महत्व कळाले आहे.

आज राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त संकल्प करूयात, "कोरोनाची लस घेऊन कोल्हापूरला कोरोनमुक्त करूयात". कोल्हापुरातील ६० वर्षांवर सर्व जेष्ठ नागरिकांना आणि ४५ वर्षांवरच्या व्याधीग्रस्त नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे, त्यांनी लस अवश्य आणि लवकर घ्यावी.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments