कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक बांधिलकी ओळखून 'एक गाव, एक गणपती' संकल्पना राबविण्याचा निर्णय माझ्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 13 गावांनी घेतला आहे. या गावांनी उचललेलं हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आणि दिशादर्शक आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलीस अधीक्षक आणि दक्षिण मतदारसंघातील सर्व पोलीस अधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीमध्ये, मतदारसंघामध्ये 'एक गाव, एक गणपती' संकल्पना जास्तीत जास्त गावांमध्ये राबविण्यासाठी लोकांचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाचा सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी या तेरा गावातील मंडळांनी आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचे व पोलीस अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार . या उपक्रमाचे इतर गावे अनुकरण करतील, याची मला खात्री आहे. - आ. ऋतुराज पाटील

Comments