कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा न करता गरजूना मदत करण्याचे आवाहन केले होते. माझ्या या आव्हानाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. आज शाहू मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांनी एकत्रित येत माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधत व्हाईट आर्मीच्या कोव्हिडं सेंटरला धान्य आणि जीवनावश्यक वस्तूची मदत केली. हे साहित्य व्हाईट आर्मचे श्री. अशोक रोकडे यांच्याकडे प्रदान करण्यात आले.
यावेळी, कोल्हापुरातील ९५ वर्षाच्या आजींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून कोरोनामुक्त झाल्या. यावेळी पुष्प देऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
या कार्यक्रमाला कुमार आहुजा, महेश वारके, अनिल चुघ, रोहन चंदवानी, विकी चावला, कृष्णात भुसारे, गजानन शिवदे, सागर तहसीलदार, किरण आरदाळकर, संताजी जाधव, विक्रम पाटील, कैलास आहुजा यांच्यासह धान्य व्यापारी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments