Search

कौतुकास्पद! कोरोना बाधित रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वतःच्या पॉकेटमनी मधून रोज सकाळी...

कौतुकास्पद!

कोरोना बाधित रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वतःच्या पॉकेटमनी मधून रोज सकाळी घरी बनवलेल्या सकस नाश्ता देण्याचा श्रुती चौगुले, अर्पिता राऊत, आचल कट्यारे, श्रेया चौगुले व नेहा पाटील या कोल्हापुरातील युवतींनी सुरु केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.

कोरोनाच्या या संकटसमयी प्रत्येक मदत ही महत्वाची आहे. सीपीआर रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्नांच्या नातेवाईकांना व गरजू नागरिकांना दररोज सकाळी सकस नाश्ता देण्याचा या युवतींचा हा संकल्प आणि त्यासाठीची त्यांची धडपड रुग्नांच्या नातेवाईकांसाठी मोलाची मदत ठरत आहे. या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक आणि आभार!2 views0 comments