कोणाताही सण असो वा संकट, पोलीस नेहमीच आपले कर्तव्य पार पडण्यासाठी कार्यरत असतात. गेली 6 महिन्यांतून अधिक काळ कोरोनाशी प्रत्यक्ष लढा देणाऱ्या पोलीस बंधू भगिनींनी विघ्नहर्ता गणरायाचा हा उत्सव उत्साहात पण सुरक्षितपणे आणि साधेपणाने साजरा व्हावा, ही जबाबदारी यंदाही पार पाडली आहे.
याबाबद्दल राज्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी बंधू भगिनींचे मी मनापासून कौतुक करतो. सर्व पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडण्यासाठीची ताकद व निरोगी दीर्घायुष्य नेहमीच लाभो, हीच गणराया चरणी प्रार्थना.🙏 - ना. सतेज (बंटी) डी. पाटील पालकमंत्री, कोल्हापूर
Comments