top of page
Search

केएमसी महाविद्यायातील सुविधांसाठी निधी देणार : आमदार ऋतुराज पाटील

'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या विचारांवर कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे सन १९८३ पासून यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज सुरु केले आहे. या महाविद्यालयामध्ये अजून सुविधा उपलब्ध करण्यासाठी बैठक घेण्यात आली. केएमसी महाविद्यालयात आयोजित या बैठकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या केएमसी महाविद्यालयातील शैक्षणिक आणि भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून गेली 38 वर्षे केएमसी महाविद्यालय सुरू आहे. अत्यंत अल्प शुल्कामध्ये या महाविद्यालयाने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असून पालकमंत्री ना. सतेज पाटील साहेब आणि आमदार चंद्रकांत जाधवजी यांची सुद्धा यासाठी मदत घेणार आहे. यामध्ये, अद्ययावत संगणक लॅब, जनरेटर, सीसीटीव्ही, सौर ऊर्जा प्रकल्प, मॉडर्न क्लासरूम, कंपाऊंड भिंत दुरुस्ती, सुशोभीकरण, ग्रंथालय आधुनिकीकरण आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

यावेळी, प्राचार्य प्रशांत नागावकर, उपायुक्त रविकांत आडसुळ, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, किरण भोसले, प्रा. जे. एम. शिवणकर, प्रा. एस. एम. शेख, पी. डी. तोरस्कर, प्रा. एस. पी. कांबळे, प्रा. रेडेकर आदी उपस्थित होते.0 views0 comments
bottom of page