कोरोना आणि पूर परिस्थिती या पार्श्वभूमीवर कसबा बावड्यातील नागरिकांच्या आरोग्याबाबत कोणकोणत्या उपायोजना राबवाव्यात, या संदर्भात आज कसबा बावडा आणि लाईन बाजार येथील डॉक्टर्स यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सविस्तर चर्चा केली.
यावेळी स्थानिक डॉक्टर्स कडून पेशंट तपासणी आलेला असताना घेतली जाणारी काळजी , या डॉक्टर्सना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.यावेळी जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे, सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसणाऱ्या पेशंटना होम क्वारंटाईन करणे, पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ संकलीत करून त्यावर कार्यवाही करणे, बावड्यातील सर्व नागरिकांची घरोघरी जावून आरेाग्य तपासणी करणे,तसेच कसबा बावडा येथे प्रस्तावित असलेल्या कोरोना केयर सेंटर साठी लागणारे मनुष्यबळ, औषधे आदी उपलब्ध करून देणे, या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी, डॉ.संदीप नेजदार, डॉ.अजय शिंदे, डॉ.सुजित पाटील, डॉ.स्वप्नील तहसिलदार, डॉ. स्वप्नील मगदूम, डॉ.प्रसाद पाटील, डॉ.अतुल सपकाळ, डॉ. अनिल हेरलगे, डॉ.कसबेकर, डॉ. प्रविण नेजदार यांनी आपली मते मांडली. - आ. ऋतुराज पाटील
Comments