कलानगरी प्रमाणे कोल्हापूर हे क्रीडानगरी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. संपूर्ण देशभरातून विविध खेळ ....
Updated: Dec 31, 2020
कलानगरी प्रमाणे कोल्हापूर हे क्रीडानगरी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. संपूर्ण देशभरातून विविध खेळ प्रकारांतील खेळाडू प्रशिक्षणासाठी कोल्हापूर येथे येत असतात. अशाच हॉकी खेळातील खेळाडूंना कोल्हापूर मध्ये राहण्यासाठी सर्वसोयींयुक्त वसतिगृह व्हावे यासाठी २५ लाख रुपये माझ्या आमदार फंडातून तसेच उर्वरित रक्कम जिल्हा नियोजन समिती व राज्य शासनाकडून उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला भेट देऊन स्टेडिअमची पाहणी केली. यावेळी, जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शासकीय योजनेंतर्गत जिल्हा हॉकी संघटनेला देण्यात येणाऱ्या पाच लाखांच्या हॉकी साहित्यांचे उदघाटन केले.
यावेळी, डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष विजय साळोखे-सरदार, रविभूषण कुमठेकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कुमार आळगगावकर, दुर्वास कदम, सागर यवलुजे, सुदाम तोरस्कर, आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील