top of page

उष्णतेच्या झळा सोसणाऱ्या प्राणीमात्रांची तहान भागवण्यासाठी ‘केअर’ या सामाजिक संस्थेने कोल्हापूर ...

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Mar 24, 2021
  • 1 min read

उष्णतेच्या झळा सोसणाऱ्या प्राणीमात्रांची तहान भागवण्यासाठी ‘केअर’ या सामाजिक संस्थेने कोल्हापूर शहर परिसरात ‘वाटर बाऊल’ची (जलपात्र) व्यवस्था करण्याची 'एक जलपात्र, तहानलेल्या प्राण्यासाठी' ही मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमातर्गत आज सयाजी हॉटेलसमोर पहिले जलपात्र ठेऊन या मोहिमेचा शुभारंभ केले. कोल्हापूरमध्ये प्राणीप्रेमी नागरिकांची संख्या मोठी असून या उपक्रमाला त्यांची नक्कीच साथ मिळेल असा विश्वास आहे.

मानव व प्राणी याच्यातील संघर्ष कमी करून प्राण्याचे मदत व पुनर्वसन करण्याच्या हेतूने केनियन ऍनिमल रेस्क्यू अँड इम्पॅथ (केअर) ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असून त्यांचे काम कौतुकास्पद आहे. या संस्थेने तहानलेले कुत्रे, गुरे, पक्षी व अन्य प्राण्यांना स्वच्श पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ठिकठिकाणी ‘वाटर बाऊल’ ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये किमान १०० ‘वाटर बाऊल’ व्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यावेळी ‘केअर’ शर्वरी पाटील, डॉ, निहारिका प्रभू, आदित्य पाटील, मिलिंद जगदाडे, विक्रांत भोसले, प्रसाद लगड, त्याचबरोबर डी. वाय. पाटील ग्रुपच्या सीएचआरओ श्रीलेखा साटम, सयाजी हॉटेलचे तुषार भोसले, आर्कीटेकट केतन जावडेकर यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील



 
 
 

Comments


bottom of page