गेली 12 वर्षांपासून मी कोल्हापूरच्या तरुणांचे संघटन करून त्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. माझ्या या तरुण सहकाऱ्यांनी मला आज पर्यंत नेहमीच मोलाची साथ दिली आहे. आज, कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उजळाईवाडी गावामध्ये संपर्क दौरा केला. यावेळी, गावातील सर्वांनीच या दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद दिला. यामध्ये, गृहिणी, शेतकरी आणि व्यापारी बांधव, गावातील ज्येष्ठ नागरिकांसोबत गावातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी, गावातील माझ्या सर्वच तरुण सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने यावेळी मला साथ दिली.
- ऋतुराज संजय पाटील
Comentarios