उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या कोल्हापूर शहरातील ९४ विद्यार्थी-विद्यार्थिनींचे महापालिकेतर्फे कोरोना लसीकरण सावित्रीबाई रुग्णालयातील नागरी आरोग्य केंद्रात विशेष लसीकरण मोहीमेअंतर्गत करण्यात आले.
परदेशातील विद्यापीठामध्ये उच्चशिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाय अशा विद्यार्थ्यांना प्राधान्याने लसीकरण करण्याच्या विनंतीनुसार ३ जून ते ५ जून या कालावधीत माहिती संकललित करून नोंदणी करण्यात आली होती. यासाठी कोल्हापूर शहरातील परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या ९४ विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार आज सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या या विद्यार्थ्यांशी संवाद साधून काळजी घेण्याची घेण्याचे आवाहन केले. तसेच या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याचसोबत, परदेशी जाणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण ५७ विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरच करण्यात येणार आहे.
यावेळी, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त शिल्पा दरेकर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, डॉ. अमोल माने, डॉ. रुक्सार मोमीन यांच्यासह लसीकरण कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Comentários