आपल्याला हातचे बोट धरून समाजामध्ये ताठ मानेने जगायला शिकवतात ते आपले वडीलच...
आई ही आपली पहिली गुरु असते. पण, आपल्याला हातचे बोट धरून समाजामध्ये ताठ मानेने जगायला शिकवतात ते आपले वडीलच. आजवरच्या माझ्या जडणघडणीमध्ये पप्पांचा खूप मोठा वाटा आहे.
आयुष्यामध्ये कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवरच राहिले पाहिजेत हा सल्ला पप्पांनीच दिला. सहजता, नम्रता या गोष्टी मी पप्पांच्याकडून शिकलो. आज #FathersDay निमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा! 'वडील' होणं काय असतं हे स्वतः 'वडील' झाल्याशिवाय कळत नाही!