आपल्याला व आपल्या कुटुंबियांना नव वर्षाच्या मनापासून शुभेच्छा! येणारे हे वर्ष आपणांस निरोगी, आनंददायी व सुख-समृद्धीचे जावो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
२०२० या वर्षांत आलेल्या कोरोनाच्या या संकटाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. या संकटाने आपल्या सर्वाना खूप काही शिकवले सुद्धा आहे. कोरोनाचे हे संकट कमी झाले असले तरी अजून पूर्णतः संपले नाही. त्यामुळे आपण सर्वांनी अजूनही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
येणारे नवीन वर्ष हे नव्या दशकाची सुरुवात आहे.या नव्या वर्षात आपण सर्वजण आपले आरोग्य जपण्याचा तसेच निसर्गाला जपण्याचा संकल्प करूया.आपले कोल्हापूर हे स्वच्छ आणि सुंदर व्हावे तसेच कोल्हापूरचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी सर्वजण हातात हात घालून एकत्रितपणे काम करूया,
पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा!
コメント