कोल्हापूर हे कलेचे माहेरघर आहे. कोल्हापुरातील अनेक दिग्गज कलाकारांनी कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. यामित्ताने आणखी एक आनंदाची गोष्ट मला शेअर करायची आहे. येत्या २८ फेब्रुवारीला माझा मित्र आणि आपल्या कोल्हापूरचा 'विराट मडके' याची प्रमुख भूमिका असलेला 'केसरी' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला तसेच महेश मांजेरकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, उमेश जगताप अशा कलाकारांच्या अभियानाने नटलेला व कोल्हापूरच्या अस्सल रांगड्या मातीतील कुस्तीची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरातच झाले आहे. खूप वर्षांनी आपल्याला कोल्हापूरच्या अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेमध्ये पाहता येणार आहे.
अजून एक गोष्ट म्हणजे आमच्या डॉ.डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा माजी विद्यार्थी कुणाल लोलसुरे याने या चित्रपटाचे साऊंड डिझायनिंग केले आहे.कोल्हापूरच्या मातीतल्या या चित्रपटाला कोल्हापुरातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील लोक भरभरून प्रतिसाद देतील, असा विश्वास वाटतो. 'केसरी'च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व खूप शुभेच्छा.-
आ. ऋतुराज पाटील
Comments