top of page
Search

आपले कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिसांबद्दल कृतज्ञ राहणे, त्यांची काळजी घेणे आपले काम आहे.

कोरोनाशी लढताना प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीपासून स्वतःला दूर ठेवणे महत्वाचे आहे. वर्क फ्रॉम होम संकल्पनेतुन घरी थांबून आपली कामे करणे क्रमप्राप्त बनले आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस मात्र कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यरत आहेत. ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणी होते, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे.तसेच विमानतळ रेल्वेस्टेशन,रस्ते या ठिकाणी पोलीस बांधव कार्यरत आहेत.ज्या ठिकाणी क्वारंटाईन कक्ष आहेत,अशा ठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी आपले कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिसांबद्दल कृतज्ञ राहणे, त्यांची काळजी घेणे आपले काम आहे. या भावनेतूनच डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील आणि पालकमंत्री ना.सतेज (बंटी) डी.पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीस बंधू-भगिनींसाठी एन ९५ या अत्यंत चांगल्या प्रतीचे 2 हजार मास्क पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले.

आ. ऋतुराज पाटील4 views0 comments
bottom of page