आज '1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील कोल्हापूरचे शिलेदार' या पुस्तकाच्या प्रकाशन करण्यात आले.
एक युवक म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मला आनंद आणि अभिमान वाटतो. कारण देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा धगधगता इतिहास या पुस्तकातून सर्वांसमोर आला आहे.
1942 साली महात्मा गांधीजींनी 'चले जाव' चा नारा दिला आणि संपूर्ण देशात आंदोलन सुरू झाले. स्वातंत्र्य लढ्यातील हे अत्यंत महत्वाचे आंदोलन होते कारण या आंदोलनाला 'जन आंदोलनाचे' स्वरूप आले. गरीब, श्रींमंत असा कुठलाही भेदभाव न करता काहीही करून देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे यासाठी निर्णायक लढा सुरू झाला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये युवा पिढीने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. कॉलेज मध्ये बसण्यापेक्षा जेल मध्ये जाऊ, पण मागे हटणार नाही, हा विचार घेऊन युवा पिढी पेटून उठली आणि कोल्हापूर यामध्ये मागे राहिले नाही. प्राणाची बाजी लावून युवकांनी या आंदोलनात उडी घेतली.
कोल्हापुरातील सध्या असलेल्या ऐतिहासिक शिवाजी पुतळा येथे असलेला विल्सनचा पुतळा पहाटेच्या वेळी वेश बदलून क्रांतिकारकानी फोडला. याची सविस्तर माहिती विल्सन नोज कट या मध्यामातून या पुस्तकात दिली आहे. या बरोबर अनेक महत्वाच्या घटना या पुस्तकात मांडल्या आहेत. या माध्यमातून युवा पिढीला स्वातंत्र्यलढ्यातील कोल्हापूरच्या योगदानाची सविस्तर माहिती मिळणार आहे. कोल्हापूरच्या क्रांतिकारकांच्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळणार आहे.
या पुस्तकाच्या निर्मितीसाठी योगदान लाभलेल्या प्रत्येकाचे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपण सर्वजण मिळून या क्रांतिकारकांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर सुरू ठेऊया असे आवाहन करतो.
यावेळी, शरद तांबट, आनंद माने, सौ. रजनीताई मगदूम, वसंतराव मुळीक, नानासाहेब गाट, संतोष बागल, सौ. शहिदा शेख, अनिल घाटगे, रावसाहेब पाटील, जयंत देशपांडे, डी. डी. पाटील, लाला गायकवाड, बाबा जांभळे, संभाजी पोवार, बाळासाहेब सासणे, अर्जुन माने आदी मान्यवर उपथित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments